Short Habits Massive Returns In Life | ह्या छोट्या सवयी बदलू शकता तुमचा आयुष्य |

Short Habits Massive Returns In Life | ह्या छोट्या सवयी बदलू शकता तुमचा आयुष्य |
  • Save
Short Habits Massive Returns In Life

यशस्वी उद्योजक सांगतात ” तुम्ही कोणत्या पाच मित्रांबरोबर राहताय ते मला सांगा मी पुढील पाच वर्षात तुम्ही काय बनणार हे मी तुम्हाला सांगतो ” याचा अर्थ एकच आहे मित्रांनो तुमचा आयुष्य तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. मी आज तुम्हाला 10 अशा सवयी सांगणार आहे ज्याने तुमचा आयुष्य नक्कीच बदलू शकतो.(Short Habits Massive Returns In Life)

‘ तुम्ही जे भूतकाळात निर्णय घेतला त्याचाच परिणाम सध्या आहे म्हणजे जे तुम्ही सध्या राहता आणि जर तुम्ही Successful नसाल तुमच्याकडे पैसे नसतील तर आता जे तुम्ही निर्णय घेणार आहात तेच भविष्यात घडणार आहे. तर मी जे सगळे सांगणार आहे ते नक्की अमलात आणा आणि यशस्वी व्हा.

1) Write Things Down ( गोष्टी लिहा ) :-

हे तुम्हाला वाईट वाटेल परंतू स्वतःला तीस मार खान समजून घेऊ नका. मला हे सगळं लक्षात राहतं, मी कशाला लिहत बसू, मला काय गरज आहे, ह्याच घमंडमुळे तुमचे सध्या ही परिस्थिती आहे. म्हणून कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे आहे ते लगेच एका कागदावरती लिहा जेणेकरून भविष्यातही त्याचा वापर होईल.

2) Begin Your Day With End In Mind ( शेवट लक्षात घेऊन दिवसाची सुरुवात करा.) :-

काय तुम्ही शाळेला जातंय, कॉलेजला किंवा कुठे तुम्ही नोकरी करता, दररोज प्रमाणे उठणे, जेवणे, काम करून येणे ह्या सवय अंगी लावून घेऊ नका. तुमचा दिवसाचे शेवट काय असणार हे डोक्यात ठेवूनच दिवसाची सुरुवात करावी. म्हणजे आजच्या दिवसात मला असं कोणतं काम करायचं आहे ज्याने माझं भविष्य सुधारेल जसं बिजनेस स्टार्ट करण्यासाठी त्याची पूर्ण माहिती घेणे, नोकरी करता साईड इन्कम तसे कमवता येईल याची माहिती घेणे. इ.

3) Plan Intentional Break ( जाणीवपूर्वक कामातून वेळ काढणे.) :-

जॉब करताना, कॉलेजमध्ये असताना आपण Full Focus ने काम किंवा अभ्यास करतो. त्यादरम्यान आपल्या शरीराला सुद्धा आरामाची गरज असते. त्यामुळे तुमच्या कामातून जाणीवपूर्वक पाच ते दहा मिनिट ब्रेक घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे शरीराला थकवा येणार नाही आणि नवीन ऊर्जा भेटेल. हे ब्रेक तुम्हाला पुढील टास्क साठी प्रवृत्त करेल.

4) Drink Atleast A Glass Of Water First ( आधी किमान एक ग्लास पाणी प्या ) :-

हे मी नाही तर बरेच आहार तज्ञ डॉक्टर रेकमेंड करतात दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करावे.( शक्यतो सकाळी उपाशीपोटी प्यावे ) ज्यामुळे तुमच्या शरीराची जंतू निघून जातील आणि तुमचा पूर्ण दिवस उत्साही राहतो.

5) Track Your Habits ( सवयींवर नियंत्रण ठेवा) :-

आपल्या दैनंदिन कामांमध्ये अशी बरेच काम आपण करतो ज्यामुळे आपला वेळ खूप वाया जातो. कदाचित तो वेळ आपण चांगल्या ठिकाणी गुंतवला असतात. तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे कोणता असा काम आहे ज्यामुळे माझा वेळ खूप जातो. त्या कामाला तुमच्या महत्त्वाचे कामापासून लांब करा जेणेकरून ते तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आणि तुमचा वेळ वाचू शकतो.

6) Practice One Tap Rule ( एकाच Tab ची नियम पाळा) :-

बघा आपण लॅपटॉप वर किंवा PC वर महत्त्वाचे काम करत असताना ब्राउझिंग वर बरेचसे टॅब ओपन झालेला असतात. ज्यामुळे आपण डिस्ट्रक्शन होतो आणि महत्त्वाचं काम करताना तो खूप Delay होतो. त्यामुळे महत्त्वाचे काम करताना सर्व टॅब डिलीट करा आणि एकच टॅब ओपन करा. ज्यामुळे तुम्ही डिस्ट्रक्शन होणार नाही आणि फालतू वेळ वाया जाण्यापासून तुम्ही तो वाचू शकता.

7) Finish Your With Purpose ( दिवसाची शेवट उद्देश ठेवून करा ) :-

आजच्या दिवसात आपण कोणत्या कोणत्या महत्त्वाचे काम केले ते तुमच्या डेली नोटबुक वर लिहा, सोबतच दिवसाचे शेवट उद्या कोणत्या महत्त्वाचे काम आहेत जे करायचे आहेत ते लिहूनच करा. त्यामुळे तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुमच्याकडे कारण असतो की, आज महत्त्वाचे कोणते काम करायचे आहेत आणि एक शरीरात एक वेगळीच वजन निर्माण होते.

8) Be Sharp About How You Read The News ( बातमी वाचताना शातीर होऊन वाचा) :-

जर तुम्हाला सवय लागली असेल सकाळी उठून बातम्या बघायची तर त्या बातम्यांना तुम्ही फिल्टर करून बघा. म्हणजे समजा एखादी महत्त्वाची बातमी आहे तर ती बातमी वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून फिल्टर करून बघा आणि योग्य ते माहिती मिळवून घ्या, कारण आजच्या जमान्यामध्ये एखाद्या छोट्याशा बातम्या ला सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे फिरवून चुकीची माहिती पसरू शकतात. त्यामुळे तुमचा मत पूर्णपणे चेंज होऊ शकतो.

9) Don’t Say Yes ( लगेच होकार देऊ नका) :-

जर तुम्हाला एखादा व्यवहार, समोरच्याचं बोलणं किंवा एखाद्या निर्णय जर तुम्हाला पटत नसेल आणि तुम्ही त्याला राजी नसाल त्यावेळेस बिनधास्त संकोच न होता त्याला नकार द्या. प्रेशर मध्ये येऊन तुमच्या मनाच्या विरुद्ध जाऊन होकार देऊ नका. आता होकार देऊन भविष्यात पश्चाताप होण्यापेक्षा आता नकार दिलेला कधीही चांगला. 1

0) Invest In A Hobby ( छंद जोपासा ) :-

आपल्या कामाच्या व्यतिरिक्त एक असा छंद झोप असा ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे गुंतून जाल किंवा ती छंद तुम्हाला मनापासून आवडतो. अशाने तुमचा मेंटल हेल्थ आणि शरीर तंदुरुस्ती सोबत उत्साही राहतो. आणि असे छंद आपल्याला जेवण जगण्यास प्रोत्साहन देतात.

तर हे होते मित्रांनो 10 अशा छोट्या सवयी जे आपण अमलात आणून आपले आयुष्य सुधारू शकतो. बघा मित्रांनो आपल्याकडे दोन पर्याय असतात एक “आहे तो आयुष्य पुढे ढकलत न्यायचा” दुसरा “एक निर्णय घेऊन आहे त्या सवयी बदलून आयुष्य बदलायचा.” निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आयुष्यात तुम्हाला बदलायचा आहे. तर तुम्ही काय करणार आणि काय हवे आहे हे तुम्हाला आणि तुमच्या मनाला माहीत तर माझं काम होता. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायचं निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे धन्यवाद.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *