Mistakes To Avoid In Your 20s | विसाव्या वर्षी कोणत्या गोष्टीत वेळ घालू नये ?

Mistakes To Avoid In Your 20s | विसाव्या वर्षी कोणत्या गोष्टीत वेळ घालू नये ?
  • Save
Mistakes To Avoid In Your 20s ( Image Source by Google)

What are common mistakes to avoid in your 20s : मुला आणि मुलींचे दहावी आणि बारावीचे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा महत्त्वाचा काळ चालू होतो. या काळात त्यांच्या आयुष्याचे महत्त्वाचे काळ राहणार आहे. कारण, एक निर्णय आणि आयुष्य खराब होऊ शकतात. आणि आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे विसाव्या वर्षी वेळ वाया ना घालवता आपल्या उत्पन्नावर उत्तम कसे काम कराल. (Mistakes To Avoid In Your 20s)

🔸 बिंदास जागा…. टेन्शन अजिबात घेऊ नका. उगाच म्हाताऱ्या माणसासारखं न पचणारे सल्ले मित्रांना देत बसू नका. त्यामुळे मित्र दुरावतील आणि विसाव्या वर्षी मित्र लांब झाले तर तो काळ खूप वाईट जातो.

🔸 प्रत्येक गोष्टीला गुगलवर जाऊन माहिती मिळवत बसू नका. हे अद्भुत जग वेगवेगळ्या माणसांविषयी माहिती जर मिळवायचा असेल तर ते शक्य आहे फक्त प्रवासामुळे. ज्यामुळे मीडिया सर्चिंग सफर थांबवा आणि संधी मिळाली की लगेचच प्रवास करा.

🔸 विसाव्या वर्षी पैसे कमावण्याच्या मागे लागू नका. हे वय सोन्यासारखं असतं ते परत कधीच येत नाही. त्यामुळे या वयात शिक्षण घेण्याकडे लक्ष द्या आणि ते व्यवस्थित पूर्ण करा आणि जे पदवी संपादन करा. ज्यामुळे पुढे जाऊन चांगले पैसे कमवू शकता.

🔸 कितीही राग आला आई-वडिलांकडून कितीही मोठ्या चुका झाल्या तरी आई-वडिलांस उलट बोलू नका. हे सभ्याने, संस्कार मुलाचे लक्षणे नाहीत.

🔸 मात्रभाषा चा खोटा अभिमान बाळगू नका. स्वतःचा मात्रभाषेचा सन्मान करत एक परकीय भाषा शिका. शेवटी करिअर आणि पैसे कमवण्यासाठी भाषा महत्त्वाचे आहे.

🔸 ज्या मित्राच्या स्वप्न आहेत आणि स्वार्थी मित्रांसाठी आपला बहुमोल वेळ वाया घालू नका. तोच वेळ आपल्या शिक्षणाकडे अनेक कौशल्य शिकण्याकडे लक्ष द्या.

🔸 ह्या वयात जवानीची मोड फुटू शकते, मुलींच्या मागे फिरू नका त्याऐवजी स्वप्नांच्या मागे धावा मुली आपोआप तुमच्या मागे येतील.

🔸 शक्य झाल्यास जिम लावल्यास आपले शरीर आणखीन मजबूत बनवण्यावर भर द्या. जिम लावणे व प्रोटीन खाणे शक्य नसल्यास घरच्या घरी योग्य ते व्यायाम केल्यास शरीर फिट राहतो.

🔸 शाळेत आणि कॉलेजमध्ये आपण न आवडणारे शिक्षकांचे नेहमी टिंगल करताना पाहतोय किंवा करतोय. न आवडणारे शिक्षकांचे टिंगल कधी करू नका.

🔸 मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी सिगरेट बिअर आणि मध्यजन्य पदार्थ पिणे अथवा खाणे टाळा. हा खरा पुरुषार्थ नाही त्याच्यामुळे भले भले जीवन उजाडले आहेत. आपली परिस्थिती बघा आई-वडिलांकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्या.

🔸 असं म्हणतात विसाव वरीस कोवळा असतो त्यामुळे बाहेरच कोणताही फास्टफूड खात जाऊ नका. त्याऐवजी घरातील बनवलेले फळभाज्या खात जावा.

तर हे होते मित्रांनो काही महत्त्वाचे टिप्स ज्यामुळे तुम्ही विसाव्या वर्षी तुमचा बहुमूल्य वेळ वाचू शकता आणि तुमच्या शिक्षणाकडे आणि नवीन कौशल्याकडे जास्तीत जास्त वेळ देऊन जीवन उत्तम बनवू शकता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *