Juna Furniture Marathi Movie Trailer | बापाने मुलावरच केस केला…

Juna Furniture Marathi Movie Trailer | बापाने मुलावरच केस केला…
  • Save
Juna Furniture Marathi Movie Trailer

Juna Furniture : जेव्हा जुना फर्निचर या मूवीचे टीजर दोन आठवड्यापूर्वी लॉन्च झाला होता. तेव्हापासून या मूवीचा चर्चा सुरू होती. तर शेवटी 14 एप्रिल ला या मूवीचा टीजर लॉन्च झाला आहे. ” माझं नाव गोविंद श्रीधर पाठक, गेल्या महिन्यातच 71 लागलं मला ” या दमदार आवाजाने टिझर ची सुरुवात होते. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर एका वडिलांची भूमिका निभावतात ज्यांची तब्येत बऱ्यापैकी ठीक आहे परंतु गुडघे वेळेवर साथ देत नाहीत. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विदेशी शिक्षणासाठी जातो आणि तिकडे सेटल होतो इकडे हे दोघच राहतात. काही कारणाने महेश मांजरेकर म्हणजेच गोविंद श्रीधर पाठक यांच्या पत्नीचे हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो. त्यादरम्यान गोविंद त्याच्या एकुलत्या एक मुलाला जो विदेशात शिक्षण घेऊन सेटल झाला आहे. त्याला कॉल करतात आणि तो रिस्पॉन्स देत नाही आईचा मृत्यू झाल्या तरी सुद्धा तो पाहायला सुद्धा येत नाही. आणि गोविंद त्याच्या मुलावरच केस करतात आणि ते केस कोर्टामध्ये जाते. ” जेव्हा मुलगा फोनवर बोलतो बाबा काय चाललंय हे तेव्हा गोविंद बोलतात आपण कोर्टात बोलू.”

(Juna Furniture Marathi Movie Trailer)

Juna Furniture Movie Main Story Line :-

जुना फर्निचर च ट्रेलर लॉन्च झाला आहे त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की बाप स्वतःच्या मुलावर केस टाकला आहे. आणि मानधन म्हणून 4 कोटी 72 लाख 86 हजार 100 रूपये हक्काचे पैसे मागतात. याचा कारणही तसाच आहे. ज्या मुलाला आई-वडील लहानपणापासून स्वतःचा जीव म्हणून सांभाळतात स्वतः रक्ताचा पाणी करून, कष्ट करून पैसे कमवून मुलाला शिक्षण देतात आणि तो मुलगा विदेशात जाऊन सेटल होऊन आई-वडिलांकडे पाहत सुद्धा नाही अशा वेळेस म्हाताऱ्या आई-वडील काय केले पाहिजे. अशा वृद्धावस्थेत त्यांचा आधार कोण देणार त्यामुळे जीवनातल्या सत्य घटनेच्या आधारावर महेश मांजरेकर आणि जुना फर्निचर या नावाने चित्रपट घेऊन येत आहेत.

जुना फर्निचर सत्य घटना की काल्पनिक :-

एका रिसर्च नुसार हे सिद्ध झालं आहे सोबत बऱ्याच मुलांवरती सुद्धा अभ्यास करून एक रिपोर्ट सादर करण्यात आला की त्यामध्ये जो मुलगा शिक्षणासाठी विदेशात जातो, तिथे गेल्यावर सुरुवातीचे दोन ते तीन महिने आई-वडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. नंतर तिथल्या वातावरणाशी मिसळल्याने आई-वडिलांशी बोलणं कमी करतो आणि नंतर नंतर तो पूर्णपणे इग्नोर करायला चालू करतो. कारण कारण विदेशामध्ये त्याची तशी मानसिकता झालेली असते भारतात जायचं नाही आणि जे आपले आई-वडील आहेत जे गावंढळ पद्धतीने राहतात त्यांच्याशी भेटून आपली इमेज कमी करायची नाही असे त्या मुलांची मानसिकता झालेली असते. असे पण काही आई-वडील आहेत त्यांचे मुलं विदेशात तर गेलेत परंतु कधीच आले नाहीत आणि त्या आई-वडिलांचे शरीर शेवटीं शेजारचे उचलतात. आणि हे जोक तुम्ही सोशल मीडिया वरती बरेच ठिकाणी वाचला असाल की एक आजोबा हॉस्पिटलमध्ये आजार ग्रस्त होऊन पडलेले असतात आणि शेजारी एक अनपड मुलगा थांबलेला असतो आणि डॉक्टर जेव्हा आजोबाला विचारतात तुमचे बाकीचे तीन मुलं आले नाहीत का तेव्हा त्या आजोबा उत्तर देतात बाकीचे तिघं मुलं चांगलं शिक्षण घेऊन विदेशात सेटल झाले आणि हाच नालायक मुलगा शिक्षण न घेता माझ्याजवळच थांबला आहे परंतु त्या आजोबाला हे माहीत नाही की त्याच मुलामुळे आज त्यांचा जीव वाचला आहे.

Juna Furniture Movie Release Date :

Satya Saiee आणि Skylink Entertainment व Film By Mahesh Manjrekar जुना फर्निचर ” ह्या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा.” हे चित्रपट जवळच्या सिनेमागृह मध्ये 26 एप्रिल पासून प्रसारित होणार आहे.

Juna Furniture Marathi movie starring :

जुना फर्निचर हा महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी आणि मेधा मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *