India Vs America Using AI : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI या क्षेत्रात अमेरिका व ब्रिटन यासारख्या बलाढ्य देशांनाही भारताने मागे टाकून आघाडी घेतली आहे, असा दावा न्युज रिपोर्टिंग ऑर्गनायझेशन ANI केलेल्या एका सर्वेच्या अहवालात सादर केला आहे.
या रिपोर्ट मध्ये देशाकडून AI तंत्रज्ञान स्वीकारण्याची गती, यासाठी योग्य बदलांचे तत्परता, नवीन आव्हाने आणि यशस्वी करण्यासंबंधीचा डाटा, स्पष्टीकरण देणारी माहिती देण्यात आली आहे. त्या रिपोर्ट मध्ये म्हटला आहे की भारत, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका हे देश स्वीकारण्याचे बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत. या उलट स्पेन ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यासारखे देश तांत्रिक प्रगतीत मागे पडले आहेत.
संपूर्ण जगात ह तंत्रज्ञानाच्या आघाडीवर असलेल्या देशातील 67% कंपन्यांकडे हायब्रीड आयटी वातावरण आहे. भारतात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 70% तर जपानमध्ये सर्वात कमी म्हणजेच 24% आहे.
60 टक्के कंपन्यांमध्ये AI प्रकल्प सुरू झाला.
- या सर्व मध्ये जगातील प्रमुख 10 देशातील 1300 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना घेण्यात आले होते.
- या रिपोर्टनुसार भारत, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या देशातील 60 टक्के कंपन्यांमध्ये या प्रकल्प सुरू आहेत आणि पद दर्शक टप्प्यात सुरू आहे.
- याउलट स्पेन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जर्मनी आणि जपान या देशातील केवळ 36 टक्के कंपन्यांनी AI साठी पुढाकार घेतला आहे.
भारतात याचा वापर सर्वाधिक कशासाठी करतात ?
जर तुम्ही दररोज इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला मोदींच्या आवाजामध्ये गाणं ऐकलात असेल. जेव्हा मेलोणी भारतात मोदींना येऊन भेटले तेव्हा दोघांच्या भेटीमध्ये प्रेमाचा इशारा देऊन वेगवेगळ्या प्रकारे Memes बनवले. या मेम्स मध्ये सर्वात जास्त वाटा आहे AI च आहे.
एका स्टडीनुसार भारतात AI चा सर्वात जास्त वापर हे मेम्स किंवा डिफ फेक् व्हिडिओज किंवा फोटोज बनवण्यामध्ये वापर केला जातो.
Read More कुलर पंखा एसीमुळे किती वाढते विजेची बिल ?
कशाप्रकारे AI च्या मदतीने स्कॅम करतात ?
उत्तर प्रदेश मध्ये AI संबंधित फसवणूक झाल्याचे केसेस खूप जास्त आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त कॉमन केस म्हणजे “व्हाईस क्लोनिंग.”
Voice Clone : यामध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज कॉपी करतात आणि याच्या मदतीने जसा पाहिजे तसा आवाज बनवता येतो, आणि काही आपत्कालीन स्थिती सांगून तुम्हाला कॉल करून गडबडीत पैसे मागून घेतात. तुम्ही सुद्धा आपलाच व्यक्ती आहे म्हणून पैसे ट्रान्सफर करता, आणि नंतर कळतं की तो व्यक्ती पैसे मागतच नव्हता मग तेव्हा कळतं तुमची फसवणूक झाली.
Deep Fake : त्यामध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा स्वतः तुमचा चेहरा घेतात आणि हवा तसा AI च्या मदतीने मॉडीफाय करून धमकी देतात. अशी नेमकी देतात! तुम्ही जर एवढे एवढे पैसे नाही दिला तर हे फोटो तुमच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल. तुम्ही भीतीपोटी पैसे ट्रान्सफर करता आणि असेच धमकी ते तुम्हाला वारंवार करू शकतात.