लग्ना अगोदर दोघं युवा-युवती असतात. मुलगा जाऊन मुलीला बघतो दोघांचा मत जुळतात मग लग्न होतं. ( इथे महिलेचा संपत्ती म्हणजेच स्त्रीधन) आणि पुढे दोघे संसार सुरू करतात. काही कारणामुळे यांच्या दोघांमध्ये वादावर सुरू होतो आणि नंतर संपत्तीचे वाटणे सुरू होतं. लग्नामध्ये बायकोला मिळालेले दागिने, साड्या, भेटवस्तू हे सर्व कोणाच्या याच्यावरून वाद सुरू होतो. पत्नी हे वस्तू परत मागू लागते मात्र सासरेमंडळी नकार देतात. पण आता प्रश्नाचा पडतो ” बायकोच्या संपत्तीवर नवऱ्याचा अधिकार असतो का ? ” हे आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणारच आहोत अगोदर हे जाणून घेऊयात की,
स्त्रीधन म्हणजे नेमकं काय ?
महिलेला लग्नावेळी देण्यात आलेल्या वस्तू असेल दागिने साड्या किंवा नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू इ. आदी च स्त्रीधनात समावेश होतो. त्यामध्ये भेट म्हणून दिलेल्या मालमत्तेचाही समावेश होतो, तसे भेटवस्तू माहेरकडून मिळालेल्या असो वा सासर कडून दोन्हीचा समावेश स्त्रीधनात होतो .
कोणालाही दाव्याचा अधिकार नाही
स्त्रीधन बद्दल कायदा काय म्हणतो ते आपण पाहणार आहोत.
- हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 आणि हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार महिलेच स्त्रीधन आपल्याकडे ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि स्त्रीधनाचा वापर ते कसाही करू शकते आणि कोणालाही देऊ शकते तसेच गरज पडल्यास विकू शकते.
- सासरची मंडळी आणि नातेवाईक तसेच पतीचा या श्रीधर काही अधिकार नसतो. महिलेने स्त्रीधन सासरची कोणत्याही व्यक्तीला किंवा पती, सासू किंवा सासरे यांना ठेवण्यासाठी दिले असले, तरी ते केवळ स्त्रीधन रक्षण करते ठरतात. अशावेळी महिलेने गरज पडल्यास स्त्रीधनाची मागणी केली तर, त्यांना नकार देता येणार नाही तिला ते परत द्यावेच लागेल.
- समजा : सासरच्या मंडळींनी त्या स्त्रीला स्त्रीधन परत करण्यास नकार दिला तर ती, स्त्री पोलीसंकडे तक्रार करू शकते. पतीपासून विभक्त झाले असले तरी त्या स्थितीत ती महिला कायद्याने स्त्रीधन सोबत घेऊन जाऊ शकते.
Read More उत्तम गृहिणी होण्यासाठी उपयुक्त टिप्स
मृत्यूनंतर स्त्रीधनावर कोणाचा अधिकार असतो ?
त्या महिला कडे संपत्ती कमी असू दे किंवा जास्त असू दे तर त्या स्त्रीधनावर त्या महिलेचा एकाधिकार असतो. म्हणजे, तिच्याशिवाय स्त्रीधनावर कोणाचाही अधिकार नाही. आणि त्या महिलेच्या मृत्यूनंतर ते कोणाला मिळावे हे त्याच्या मृत्यू पत्रावर अवलंबून असते. समजा मृत्युपत्र न करता त्या स्त्रीचा निधन झाल्यास त्या महिलेच्या वारसदारांमध्ये स्त्रीधनाचे वाटप केले जाते.
सुप्रीम कोर्टाचे स्त्री जनावर काय आदेश आहे ?
केरळमध्ये एक घटना समोर आली होती, जिथे नवरा बायको संसार करत असताना आर्थिक अडचणीत पतीने महिलेच्या संपत्ती म्हणजे दागिने मागितले होते. तेव्हा त्या महिलेने ते देण्यास नकार दिले आणि पतीला तिच्याशिवाय दुसरा पर्याय सापडत नव्हता आणि त्या वादात ते केस कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने आदेश देताना स्पष्ट म्हटले होते की, संकटात पत्नीच्या स्त्रीधनाचा वापर करता येईल; परंतु हे धन त्या स्त्रीला परत करणे हे पतीची जबाबदारी आहे. यावर दोघांचा समान अधिकार नसतो.