Health Care Tips : बघा मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम करताना शारीरिक थकवा मानसिक त्रास आणि झोपेचं त्रास आणि तोंडाचा दुर्गंध असे दैनिक समस्या येत राहतात. आजच्या पोस्टमध्ये आपण या सर्व समस्यांचा कोणते उपाय आहेत आणि कोणत्याही फळ आहेत जे खाल्ल्याने आपल्याला वरील समस्यावर समाधान मिळतो.
1) शारीरिक थकवा जाणवत असेल तर…?
जर तुम्हाला शारीरिक थकवा जाणवत असेल आणि सोबतच वजन न वाढण्याचे समस्या देखील असेल तर तुम्ही केळी खायला सुरुवात केली पाहिजे. केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात ज्याच्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते तसेच एका रिसर्च नुसार केळी चे दररोज सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते.
आता प्रश्न पडतो की केळी दररोज किती खायला पाहिजे ?
डॉक्टरच्या म्हणण्यानुसार जर तुमचा उद्देश वजन वाढवण्याचा असेल तर तुम्ही सकाळी दोन केळी आणि संध्याकाळी दोन केळी खाल्ले पाहिजे. आणि जर तुमचा उद्देश ऊर्जा मिळवायचे असेल आणि थकवा दूर करायचा असेल तर तुम्ही फक्त सकाळी दोन केळी खाऊ शकता.
2) मानसिक ताण तणाव असेल तर…. ?
दैनिक कामात ओव्हरलोड प्रेशर मुळे आपल्या डोकं व्यवस्थित काम व मॅनेज करू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला मानसिक त्रास व डिप्रेशन आणि एन्जायटी सारख्या समस्या जाणवू लागतात त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तीळ खाल्ले पाहिजे. एका रिसर्च नुसार सिद्ध झाला आहे की तीळ खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो कारण त्यामध्ये मॅग्नेशियम असतात जे शरीरातील ताण तणाव आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) कमी करतो.
3) अनिद्रेचा ( झोपेचं) त्रास असेल तर….?
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार जो व्यक्ती पाच तासापेक्षा जास्त मोबाईल वापरत असेल त्या व्यक्तीला झोपेचा त्रास असू शकतो. आणि जर तुम्हाला सुद्धा तोच समस्या असेल तर त्याचा दुसरा अर्थ होतो की तुम्ही अति प्रमाणात मीठ खाताय. यावर उपाय असा आहे तुम्ही जे मोबाईल पाच तास वापरताय त्याला दिवसातून तुम्ही एक ते दोनच तास वापरा आणि झोपेच्या अगोदर मोबाईल वापरण्यात टाळा किमान एक तास अगोदर मोबाईल बंद ठेवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पण खाताय त्यामध्ये मिठाचे प्रमाण हे खूप कमी केलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला अनिद्रेचा त्रास तसेच उच्च रक्तदाब, किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. तसेच चिप्स फरसाण फास्ट फूड लोणचं आणि बिस्किट्स आणि पॅकेज फूड या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप अधिक असतो त्यामुळे हे खाणे टाळा.
4) तोंडाचा दुर्गंध वास येत असेल तर…..?
आपल्या लहानपणापासूनच हे शिकवलं जातं की सकाळी उठणे ब्रश करणे झालं काय ह्याच्यामुळे तोंडाचा दुर्गंध वास जातो ? नाही. मग काय केलं पाहिजे ज्याने तोंडाचा दुर्गंध तोंडात लागलेली कीड बॅक्टेरिया नाहीसे व्हायला पाहिजे. आयुर्वेदानुसार जर तुमचा तोंडाचा दुर्गंध घालवायचा असेल तर त्यासाठी सकाळी दोन इलायची चावून खाल्ल्यास तोंडाचा दुर्गंध खूप लवकर जातो. सोबतच ह्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नाहीसे होतात ज्याच्यामुळे दात आणि हिरड्या पण चांगले राहतात.
पण एक असा प्रश्न की आपण ब्रश किती वेळा आणि किती वेळासाठी केला पाहिजे ?
डॉक्टरांचे म्हणण्यानुसार तुम्हीं दिवसातून दोन वेळा ब्रश केले पाहिजे 1) झोपून उठल्यानंतर आणि 2) रात्री झोपण्या अगोदर आणि ब्रश करताना टूथ ब्रश व्यवस्थित पाहिजे जर ब्रशचे केस वेडेवाकडे झाले असतील तर नवीन ब्रश वापरला पाहिजे आणि ब्रश करताना कमीत कमी 90 सेकंद ते 120 सेकंद पर्यंत आपण ब्रश केलं पाहिजे.
5) Immunity वाढवायचं असेल तर….?
तुम्हाला तर माहिती असेल जर इम्युनिटी वाढवायचा असेल तर त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्या शरीरातील “व्हिटॅमिन सी” ची कमी असणे परंतु जसा आपण पाहिलाय की “व्हिटॅमिन सी” हे संत्र्यामध्ये आढळून येतात. परंतु आयुर्वेदुसार आणि डॉक्टरांच्या रिसर्च नुसार संत्र्याच्या अधिक “व्हिटॅमिन सी” हे लाल पेरू मध्ये असतो.
लाल पेरू एक पेरूचा प्रजाती आहे तो खूप विशेष ठिकाणी उगवतो किंवा शेती केली जाते आणि साधारण पेरू पेक्षा त्याचे किंमत थोडी जास्त असते. परंतु जेव्हा तुम्ही हे लाल पेरू खाता तेव्हा तुम्हाला संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात “व्हिटॅमिन सी” मिळतो. ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते सोबतच ह्यात असणारे फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो ज्याने रुदय निरोगी राहतो.
नोंद : मित्रांनो वरील माहिती वेगवेगळ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि इंटरनेटवर असलेल्या आयुर्वेदिक माहिती नुसार त्यांचे फायदे आणि फळांची नावे याची माहिती दिली आहे. मराठी सम्राट वरीलपैकी कोणत्याही गोष्टी पुष्टीकरण देत नाही. कारण याचा मुख्य स्रोत न सापडल्याने आम्ही याची खात्री देऊ शकत नाही. परंतु फळ खाल्ल्याने शरीरामध्ये चांगलाच परिणाम दिसून येतो हे भूतकाळ पण शिकवले गेलो होत, वर्तमान काळ पण हे शिकवलं जातं, भविष्यकाळात पण हे शिकवलं जाईल.