Arijit Singh & Mahira Khan | अर्जित सिंगने माहेरा खानची का मागितली माफी ?

Arijit Singh & Mahira Khan | अर्जित सिंगने माहेरा खानची का मागितली माफी ?
  • Save
Arijit Singh Failed To Recognize Mahira Khan At Dubai Concert. Then This Happened

Dubai : माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात माहिरा खान दुबईमध्ये बॉलीवूड गायक अर्जित सिंगच्या कॉन्सर्ट मध्ये एन्जॉय करताना दिसते. माहिराला पहिले नजरेत ओळखू न शकल्याने अर्जित सिंगने दिलगिरी व्यक्त केले. जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यात अर्जित सिंग म्हणतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल मी त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मला आठवलं की मी त्यांच्यासाठी एक गाणं गायलं होतं मित्रांनो ” महिरा खान माझ्यासमोर आहेत ” आणि मी त्यांचा ” जालीमा गाणं गात आहे मला क्षमा करा मॅडम.”(Arijit Singh & Mahira Khan )

9 वर्षानंतर कमबॅक करतोय इमरान खान

इमरान खान डबल नऊ वर्षांनी सिनेमा इंडस्ट्री मध्ये कमबॅक करत आहेत. 2015 साली रिलीज झालेल्या कट्टी बट्टी हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर इमरान खानने बॉलीवूड मधून संन्यास घेतला अशी बातमी पसरली होती. त्यानंतर इमरान खान कोणत्या सिनेमात दिसला नाही आणि तो आता पुन्हा सायन्स ना मनोरंजन करण्यासाठी तयार झाला आहे. “हॅपी पटेल” असे इमरान खानच्या आगामी सिनेमाचं नाव असून त्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. इमरान खान पुन्हा कमबॅक करणार असल्यामुळे फॅन्समध्ये उत्सुकता भरली आहे. तो नव्या सिनेमासाठी जोरदार तयारी करत आहे आणि हे शूटिंग गोव्यामध्ये सुरू होत आहे.( Imran Khan Comeback through Happy Patel Movie)

इरफान चे वडील त्याला का म्हणायचे ” ब्राह्मण “

अभिनेता इरफान खान ला विसरणं शक्यच नाही. सोमवारी इरफान ची पुण्यतिथी होती इरफान धर्माने मुस्लिम जरी असले तरी त्याचे वडील त्याला ब्राह्मण का म्हणायचे? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.

मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या इरफान ला मांसाहार आवडत नव्हता. तो पूर्णपणे शाकाहारी होता या वागणुकीमुळे लोक इरफान ला ” ब्राह्मण ” म्हणायचे एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, तो लहानपणापासूनच शाकाहारी आहे आणि त्याला मासावर आवडत नाही. याच कारणास्तव त्याचें वडील त्याला गमतीने ब्राह्मण म्हणायचे.(Irfan Khan dad called him are you bramhan)

रणवीर सिंग चा आगामी चित्रपट राक्षस येतोय …

अलीकडच्या काळातील हिंदी चित्रपटांची टायटल ऐकता क्षणी काहींची धडकी भरवणारे आहेत, जसे ” ऍनिमल “,” शैतान’ ” भक्षक ” आधी चित्रपटाने मोहिनी घातल्यानंतर आता असंच काहीच खलनायक शीर्षक असलेला राक्षस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डायरेक्टर ” प्रशांत वर्मा ” आता भारतीय पौराणिक कथेवर आधारलेला ” राक्षस ” चित्रपट बनवण्यात व्यस्त आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असल्याचे माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे या चित्रपटाची कथा पटकथा आणि प्रीविज्युलायझेशन पूर्ण झाला असल्याचा समजतंय.( Ranveer Singh New Movie Update ” Rakshas “

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *