Personal Growth Tips : मित्रांनो चांगल्या सवय लावून घेणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी चिकाटी आणि जिद्द तर लागतोच पण अशा सवय लावून घेतल्या की, अनेक गोष्टी सोप्या होत जातात. त्यामुळे काय चांगल्या (Good Habits In Life) गोष्टी तुम्ही आत्मसात केलंत तर, त्यातून तुम्हाला निश्चितपणे तुमच्या जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
1) तुम्ही पुस्तक वाचन करून ज्ञान वाढवला पाहिजे. असं म्हणतात दहा लोकांचा ज्ञान एका पुस्तकातून मिळतो आणि पुस्तकापेक्षा जवळचा मित्र कोणी नसतो.
2) रोजचा जमाखर्चाचा हिशोब ठेवला पाहिजे दिवसभरात घडलेल्या ठळक घटना अनुभव आणि आणि त्या दिवशी कोणत्या गोष्टी शिकलात हे तुम्ही लिहून ठेवा.
3) आपल्या कामाचे सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करता आले पाहिजे आणि बदलत्या जगामध्ये काम किती केलं तरी त्याचे साजरीकरण महत्त्वाचे असते. कारण तुम्ही नेमून दिलेल्या काम करणे अपेक्षित असते. त्या पलीकडे जाऊन तुम्ही केलेले अनेक गोष्टी संबंधित पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचीच असते.
4) मातृभाषा सोबतच एक जागतिक अन्य भाषा म्हणजे ( इंग्रजी, फ्रेंच, जर्मन,.चिनी, जापनीज) आणि प्रादेशिक भाषा गुजराती, भोजपुरी, कन्नड, उर्दू, संस्कृत, तमिळ, तेलगू इत्यादी भाषा शिकावी.
5) संभाषण कौशल्य जमले पाहिजे त्यासाठी आवश्यकता वाटल्यास प्रशिक्षण घ्यावे, बोलण्यात जर प्रभावी असलेले व्यक्तींचे निरीक्षण करून त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या पाहिजे. शक्य झाल्यास लिहून ठेवणे खूप चांगले आणि दररोज सतत अभ्यास केल्यास संभाषण कौशल्य उत्तम होऊन जातो.
6) रोजच्या किंवा घरापासून दूर राहिल्यावर निभावून घेण्याइतपत स्वतःचा स्वयंपाक शिकून घेता आले पाहिजे. स्वयंपाकातील मला काही करता येत नाही मला चहा बनवता येत नाही अशी वाक्य अजिबात अभिमानास्पद नाही. स्वयंपाकातील काहीच येत नसेल तर मग अडचणीच्या प्रसंगात पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते.
7) कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजूने आणि दूरवरचा विचार आणि दूरदृष्टी ठेवली पाहिजे. एखादी गोष्ट घटना घडली असेल तर त्याचे दोन्ही बाजू असतात तर दोन्ही बाजूस समजूनच निर्णय घ्यावा.
8) सर्वात महत्त्वाचा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. ( व्यायाम , योगासने , मेडिटेशन ) या सगळ्यात पहिले प्राधान्य दिले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी असेल तर तुम्ही व्यायाम केल्यापासून आणि योग्य आहार घेतल्यापासून पर्याय नाही.
9) जग भ्रमणाचे स्वप्न पाहण्याऐवजी प्रथम स्वतःचे गल्ली, स्वतःच गाव, स्वतःच राज्य आणि पूर्ण भारत पाहून आपले संस्कृती भाषा चालीरीती आणि निसर्ग अनुभव घेणे गरजेचे आहे.
10) आपल्या सोबतच आपल्या सहकार्य यांचा पण विकास होईल याची काळजी घेणे आवश्यक असते नाहीतर फक्त आपलं आणि आपलं पोट पाहिलं तर मग कधीच आपण यशस्वी होऊ शकणार नाही.
11) स्वतःच्या आणि घरातील आर्थिक व्यवस्थापन आणि नियोजन शिकून घेणे गरजेचे आहे अनेकांना मी घरातील काही बघत नाही असे सांगण्यात खूप मोठा अभिमान वाटत असतो. प्रत्यक्षात घरातील छोट्या जबाबदाऱ्या पार पाडण्यातून कुटुंबातील सदस्यांचे वेगवेगळे पैलू आपल्याला समजत असतात. तो संवादाचा एक मार्ग असतो आणि या सगळ्यापासून लांब राहिला तर कधीतरी अचानक चकित होण्याची वेळ येते.
12) सामाजिक कामातील व घरातील जबाबदारी घेण्यास आणि नेतृत्व गुण म्हणजेच लीडरशिप शिकले पाहिजे जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडल्यामुळे नवा अनुभव मिळतो नव्या गोष्टी शिकता येतात नवी माणसे भेटतात अनुभवाचे समृद्धी आपले व्यक्तिमत्व समृद्ध बनते.
तर हे होते मित्रांनो 12 अशा चांगल्या सवयी जे तुम्ही तुमच्या जीवनात अमलात आणला तर नक्कीच तुम्ही यशस्वी कडे वाटचाल करू शकता. आणि मित्रांनो हे पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर बाकीचे पोस्ट तुम्ही नक्कीच वाचू शकता. ज्या ठिकाणी आम्ही असेच खूप सारे माहिती दायक आणि जीवन उपयोगी ब्लॉग्स Available आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडतील अशी मी आशा करतो.