Wai (Satara) : मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातले वाई एक गाव आहे.(South Kashi In Maharashtra) या गावात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तर आहेच या सोबतच ऐतिहासिक दृष्ट्या देखील या गावाला महत्त्व दिले जाते आणि या गावातून कृष्णा नदी वाहते.
या गावात शेकडो मंदिर आहेत. मित्रांनो तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु वाईट 100 हून अधिक मंदिरे आहेत आणि या गावांमध्ये कृष्णा नदीचा उस्तव साजरा केला जातो. जसे वाराणसी मध्ये गंगा ची पूजा केली जाते तसेच वाई मध्ये कृष्णा नदीची पूजा केली जाते. वाई मधील असलेले घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत.
वाई मधील असलेल्या मंदिराचे आराखडे ही पेशवा काळाची साक्ष देतात, कारण पेशव्यांच्या या शहरांमध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा करत होते. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी यात शांत व निसर्गरम्य परिसरांची उपासनेसाठी निवड केली होती असे स्थानिक अभिमानाने सांगतात.
वाईच्या घाटामध्ये वसलेले गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्य कलेचा हे उत्कृष्ट नमुना आहे. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये एक समान आहे. धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर असो व पाषणाने दिलेल्या अभेद्य पण हे त्यांचे खास वैशिट्ये.
आपण जे हिंदी सिनेमे पाहतो ना त्यांचं बऱ्याच शूटिंग या गावात होतं जशी की शाहरुख खानचा स्वादेश सिनेमा आणि जिस देश मे गंगा रहती है, गंगाजल, ओंकारा, दबंग१ , दबंग २, इश्किया, सिंगम, देऊळ, बोलवचन,जिल्हा गाझियाबाद, गुलाब गँग, आर राजकुमार, चेन्नई एक्सप्रेस आणि बाजीराव मस्तानी.
वाई मध्ये श्री सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवनी समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत. वाई येथे विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. येथे वैद्यक शिक्षण देणारी प्राज्ञप्राध्यापक पाठशाला इसवी सन 1901 पासून सुरू आहे.
नुकतीच एक माहिती बॉलिवूड सिनेमातून येतोय प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे आगामी चित्रपटाचे शूटिंग हे वाई येथील कृष्णा नदी च्या काठी करणार आहेत. ही होती मित्रांनो सातारा जिल्ह्यातील वाई या गावाचे माहिती आता प्रश्न पडतो त्या गावांमध्ये मंदिरा शिवाय फिरण्यासारखं काही आहे का तर त्यांना सांगू इच्छितो होय या गावांमध्ये फिरण्यासारखं बरेच काही आहे, सोबतच आश्चर्यकारक ठिकाण जेथे दोन्ही बाजूंनी पर्वत, अबाधित कुरण, हिरवीगार आणि विलोभनीय हिरवाई, वरवरचे स्वच्छ नैसर्गिक धबधबे डोंगरावरून खाली कोसळले आणि खडकावर रिमझिम कोसळले.
तर जर तुम्ही मला विचारलं की या ठिकाणी फिरायला जायला पाहिजे तर कधी जायला पाहिजे तर माझं तुम्हाला सांगणं आहे जर तुम्ही या ठिकाणी जात असाल तर तुम्ही पावसाळ्याच्या दिवशीचा कारण या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवशी हिरवा गार गच्च भरलेला असतो आणि मंदिराचे दर्शन सोबत भरलेले कृष्णा नदीचे दर्शन दर्शन सोबतच घाटाघाटामध्ये घनदाट जंगल हिरवगार वातावरण अनुभवायला मिळतो.